Kanpur Fire : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी एक दुर्वेवी घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी एक कुटुंब झोपलेले असताना घराला अचानक लागलेल्या आगीत एका उद्योगपती दाम्पत्यासह मोलकरणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरातील छोट्याशा मंदिरात ठेवलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली. या घटनेत उद्योगपती पती-पत्नीचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना कानपूर शहरातील काकडेदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडू नगर परिसरात घडली. मयत उद्योगपती दाम्पत्याचा बिस्किटचा कारखाना आहे.

नेमकं काय घडलं?

उद्योजक संजय श्याम दासानी आणि त्यांची पत्नी कनिका दासानी आणि मोलकरीण अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती दाम्पत्यांनी त्यांच्या घरातील देवघरात दिवाळीनिमित्त दिवा लावला होता. मात्र, घरातील देवघर हे लाकडी होते. त्यामुळे देवघरात लावलेल्या दिव्यामुळे आग लागली आणि बघता बघता ती आग घरभर पसरली. यामध्ये तीन जणांचा घरात मृत्यू गुदमरून मृत्यू झाला.

हेही वाचा : Howrah Fire : फटाक्यांच्या आतषबाजीत तीन चिमुकल्यांचा मृत्यू; ठिणगीने सिलिंडर पेटला अन्…; ऐन दिवाळीत गावावर शोककळा!

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. तसेच अग्निशमन दलाकडून तात्काळ मदतकार्यही करण्यात आले होते. तसेच मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली होती. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून तिघांनाही बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. माहितीनुसार, दिवाळीनिमित्त देवपूजा केल्यानंतर हे कुटुंब मंदिरात दिवा लावून झोपले होते. पण मंदिर एका लाकडी असल्यामुळे काही वेळाने त्याला आग लागली आणि ती आग लगेचच घरभर पसरली. त्या आगीमुळे घरात झोपलेल्या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला.

सुदैवाने मुलगा वाचला

दिव्याची आग पडद्यातून सुरू होऊन नंतर घरभर पसरल्याचे वृत्त आहे. आगीमुळे घरभर धुराचे लोट पसरले होते. घरभर धुराचे लोट पसरल्याने गुदमरून सर्वांचा मृत्यू झाला. मात्र, मयत व्यावसायिकाच्या घराला आग लागली तेव्हा त्यांचा मुलगा बाहेर गेला होता. त्यामुळे मुलगा सुदैवाने वाचला, अन्यथा त्याचाही मृत्यू झाला असता. सध्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी संजय श्याम दासानी यांच्या घरी गर्दी करत असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.