रेल्वेखाली आल्याने एका भाजीविक्रेत्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याची घटना कानपूरच्या कल्याणपूर भागात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. इरफान उर्फ लाडू असे या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Delhi Riots 2020 : दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता

फ्री प्रेस जर्नलने हिंदुस्थान टाईम्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूर पोलिसांकडून फेरीवाल्याविरोधात मोहिम सुरू आहे. अशात शुक्रवारी पोलिसांनी कल्याणपूर भागातील फेरीवाल्यांना आपले दुकान उचण्यास सांगितले. तसेच पोलिसांनी त्यांचे साहित्यही जवळ असलेलल्या रेल्वे रुळावर फेकून दिले. यावेळी इरफानचे साहित्यही फेकण्यात आले. पोलिसांनी रेल्वे रुळावर फेकलेले साहित्य उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या इरफानला वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. या अपघातात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले.

हेही वाचा – Shraddha murder case : आरोपी आफताबला तिहारमध्ये वाचायची आहेत पुस्तके; तुरुंग प्रशासनाकडे केली मागणी

इरफानचा अपघात झाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करत पोलीस घटनास्थळावरून निघून गेले, आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसेच याघटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर इतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, स्थानिकांच्या मदतीने इरफानला रुग्णालयात दाखल केल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर पोलीस रोज प्रत्येक विक्रेत्यांकडून ५० रुपये घेतात आणि येथून दुकान उचलायला लावतात, असा आरोप स्थानिक विक्रेत्यांनी केला आहे.

हेही वाचा – मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी मोबाईलवर बंदी; मद्रास उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!

दरम्यान, कानपूरचे डीसीपी लखन यादव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या भागातील अतिक्रमण हटवणे हा कामाच भाग असल्याचे ते म्हणाले. तसेच पोलिसांना बघून इरफान जागा खाली करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचे साहित्य रेल्वे रुळावर पडल्याने ते उचलण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.