उत्तर प्रदेशमधल्या विधनू सुरौली गावात ६ हजार रुपयांसाठी पतीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोनिका यादव असं या महिलेचं नाव असून तिने गुन्हा कबूल केला आहे. पतीचा खून करून तिने त्याचा मृतदेह घरातच दफन केला होता. तसेच तिथेच खाट ठेवून ही महिला रात्रभर त्या खाटेवर झोपली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस मोनिकाच्या घरी दाखल झाले. तेव्हा तिने दरवाजा उघडला नाही. पोलीस शेजाऱ्यांच्या घरातून मोनिकाच्या घरात घुसले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी आणि तपासानंतर घरातच जमीन खोदून मोनिकाचा पती उमेश यादवचा मृतदेह बाहेर काढला.

त्यानंतर पोलीस मोनिकाला घेऊन पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता ती पोलिसांना म्हणाली चहा आणि बिस्कीट खायला द्या मग सगळं सांगेन. पोलिसांनी तिची इच्छा पूर्ण केल्यानंतर तिने बेशुद्ध पडण्याचं सोंग केलं. पोलिसांनी सदर महिलेला रुग्णालयात नेलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, महिला पूर्णपणे स्वस्थ आहे.

उमेश आणि मोनिकामध्ये नेहमी वाद व्हायचा

उमेशचे तीन मोठे भाऊ आहेत. ज्यांची नावं नरेंद्र, राजेश आणि मुनेश अशी आहेत. तो घरात सर्वात धाकटा होता. सर्व भाऊ सरौली गावात वेगवेगळ्या घरांमध्ये राहातात. उमेशची आई शिवदेवी यांनी पोलिसांना सांगितलं की, मोनिका आणि उमेशमध्ये नेहमी भांडणं व्हायची. मंगळवारी मोनिकाने उमेशला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्याच दिवशी त्या दोघांमध्ये ६ हजार रुपयांवरून भांडण झालं होतं.

हे ही वाचा >> भाजपाने त्रिपुरा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, जेपी नड्डा, स्मृती इराणींसह स्टार प्रचारकांच्या ३६ सभा होणार

मुलं शाळेत गेल्यावर नवऱ्याची केली हत्या

मोनिका आणि उमेशची दोन मुलं गावातल्या प्राथमिक शाळेत शिकतात. बुधवारी सकाळी १० वाजता दोन्ही मुलं शाळेत गेली. दुपारी उमेश जेव्हा झोपेत होता तेव्हा तिने उमेशची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरातच दफन केला. त्यानंतर त्या ठिकाणी खाट ठेवली. पोलिसांना संशय आहे की, या हत्येत मोनिकासोबत अजून कोणीतरी सहभागी असावं. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, मोनिकाला या हत्येचा बिलकूल पश्चाताप नसल्याचे तिने सांगितले, यासंबंधीचं वृत अमर उजालाने प्रसिद्ध केलं आहे.