रविवारी रात्री डीजे ट्रॉलीचा हायव्होल्टेज वायरशी संपर्क आल्याने झालेल्या भीषण अपघातात कंवरियांचा मृत्यू झाला. बिहारमधील हाजीपूरमधील औद्योगिक पोलिस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर गावात ही घटना घडली. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या दुर्घटनेत सहाहून अधिक जण भाजले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सोनपूर येथील बाबा हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी कंवरीया डीजे ट्रॉलीवर जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सुलतानपूर गावात एक ट्रॉली एका हाय-टेंशन लाइनच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सुलतानपूर गावात एक ट्रॉली एका हाय-टेंशन लाइनच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला. ट्रॉलीवरील सर्व कंवारिया पहेलेजा येथे गंगाजल भरून परतत होते आणि सोनेपूर येथील बाबा हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जात होते. मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, चंदन कुमार, कालू कुमार आणि आशिष कुमार यांचा समावेश आहे.

हेही वाचा >> Karnatak Crime : डोळ्यांवर पट्टी बांधली, हात-पाय धरले अन्…; पेन चोरला म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला आश्रमात अमानुष मारहाण!

मृतांमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश

पीडितांमध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर हाजीपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ११ हजार व्होल्टच्या वायरशी संपर्क आल्याने हा अपघात झाला. एक प्रत्यक्षदर्शी आणि गावातील रहिवासी मधुरेंद्र कुमार यांनी सांगितले की ट्रॉली हरिहरनाथकडे जात होती.११ हजार व्होल्टच्या लाईनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन हा अपघात झाला. त्यावेळी ट्रॉलीवर बरेच लोक होते. यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत एकाच गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.