भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार नरेंद्र मोदी म्हणजे ‘मॉडेल ऑफ डिव्हायडिंग इंडिया (MODI)’ असल्याची जळजळीत टीका केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल नेटवर्किंग साईटसवरून बनावट छायाचित्रे आणि माहितीच्या आधारे भाजपकडून जातीयवादी प्रचार केला जात आहे. आसाममध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनेलाही भाजप आणि मोदीच जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करत असून त्यांचे राजकारण देशाला जातीयवादाकडे नेणारे असल्याची टीका कपिल सिब्बल यांनी केली. आसाममधील कोक्राझार आणि बाक्सा जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Story img Loader