आगामी काळात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून आता राजकीय वादंग सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.
“आमच्या सरकारला हवे आहे : एक सर्वसमावेशक अफगाणिस्तान. त्यांच्या “अब्बा जान” टिप्पणीसह योगींना काय हवे आहे: एक सर्वसमावेशक यूपी किंवा विभाजित करा आणि राज्य करा?” असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केलं आहे.
Our Government wants :
An inclusive Afghanistan
With his “ abba jaan “ remark
What does Yogiji want :An inclusive UP
Or
Divide and rule ?— Kapil Sibal (@KapilSibal) September 13, 2021
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (रविवार) कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टी (सपा)वर निशाणा साधला आणि आरोप केला की, समाजवादी पार्टीचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहचवत होते. २०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का नव्हते मिळत? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहचत होतं. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल.
#WATCH | Under PM Modi leadership, there is no place for appeasement politics….Before 2017 was everyone able to get ration?….Earlier only those who used to say ‘Abba Jaan’ were digesting the ration: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Kushinagar pic.twitter.com/CPr6IMbwry
— ANI UP (@ANINewsUP) September 12, 2021
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरूवातीस विधानसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा, काँग्रेस, सपा आणि बसपा या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष सक्रीय झाले आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३१२ जागांवर विजय मिळवला होता. ४०३ सदस्य संख्या असलेल्या विधानसभा निवडणुकीत ३९.६७ टक्के मत मिळवले होते, समाजवादी पार्टीला ४७, बसपाला १९ तर काँग्रेसला केवळ सात जागांवर विजय मिळवता आला होता.