मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि राज्यसभा खासदार व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सडकून टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी रामलल्ला यांच्या दर्शनासाठी जायचं असेल तर भक्त म्हणून जा, राजकीय पर्यटक म्हणून नाही असं सुनावलं. दुसरीकडे कपिल सिब्बल यांनी प्रभू रामांनी सत्याचा मार्ग निवडत त्याग केल्याची आठवण करत शिंदे-फडणवीसांना संधीसाधू आणि गद्दार म्हटलं.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “जे रामलल्ला यांच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत त्यांनी भक्त म्हणून दर्शन घ्यावं, राजकीय पर्यटक म्हणून जाऊ नये. या पवित्र ठिकाणाचा राजकारणासाठी वापर होताना पाहून वाईट वाटलं. असं असलं तरी ते केवळ ‘गद्दार’ आहेत, दुसरं काहीही नाही.”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

कपिल सिब्बल म्हणाले, “शिंदे अयोध्येत आहेत. प्रभू राम यांनी प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला आणि त्याग केला. बाळासाहेब ठाकरेंनीही हे गुण आत्मसात केले. षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाही.” कपिल सिब्बल यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणारं हे ट्वीट प्रियंका चतुर्वेदींनीही रिट्वीट केलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याची माहिती देताना म्हटलं, “जय श्रीरामच्या जयघोषात अयोध्या नगरीत माझे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील सर्व सहकारी मंत्री आणि आमदार यांच्यासह प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या रामलल्लाच्या मंदिरात महाआरती केली.”

“अयोध्येतील हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर महंतांची भेट घेतली. यावेळी शिवसेना भाजप युतीचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Story img Loader