१५ एप्रिलच्या रात्री प्रयागराजच्या कॅल्विन वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर जे काही झालं ते मीडियाच्या कॅमेरातून संपूर्ण जगाने पाहिलं. अतिक अहमद आणि त्याचा अशरफ या दोघांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ती घटना सगळ्या जगाने पाहिली. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेसं जात असतानाच या दोघांची हत्या करण्यात आली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात तिघेजण तिथे शिरले आणि त्यांनी पोलिसांचं कडं असूनही या दोघांवर गोळ्या झाडल्या. या हत्याकांडाला ४९ तासांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. पण काही प्रश्न अनुत्तरित आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी या हत्याकांडावर आठ असे प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तर मिळाली नाहीत. परंतु ते प्रश्न प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवतात.
कपिल सिब्बल यांनी सोमवारी संध्याकाळी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, “अतिक आणि अशरफ, नष्ट करण्याची कला, आश्चर्यचकित करणारी गोष्ठ आहे की, रात्री १० वाजता वैद्यकीय तपासणी करणार होते. पीडितांना चालत नेलं जात होतं. माध्यमं सहज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होती. मारेकरी एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांच्याकडे सात लाखांची शस्त्र होती. हल्लेखोर आधीपासूनच प्रशिक्षित होते. तिन्ही मारेकऱ्यांनी हत्येनंतर आत्मसमर्पण केलं.”
२. वैद्यकीय इमर्जन्सी नव्हती
३. पीडितांना (अतीक-अश्रफ) चालत नेलं जात होतं
४. माध्यमांना सहज त्यांच्यापर्यंत पोहचता आलं.
५. मारेकरी एकमेकांबद्दल अनभिज्ञ होते का?
६. मारेकऱ्यांकडे ७ लाखांहून अधिक किंमतीच शस्त्र होती का?
७. हल्लेखोर आधीपासूनच प्रशिक्षित होते.
८. तिघांनी हत्येनंतर आत्मसमर्पण केले.
अतिक आणि अशरफ या दोघांच्या हत्येचा कट रचला गेला का? हा प्रमुख प्रश्न आहे. कारण या दोघांना ठार करणारे तीन हल्लेखोर विविध भागातून प्रयागराजला पोहचले होते. या तिघांनी जय श्रीरामचे नारे दिले. हत्या केल्यानंतर तातडीने बंदूक फेकून देत आत्मसमर्पण केलं. त्यामुळे यामागे फुलप्रुफ प्लान करून कट रचला गेला का? हा प्रश्न आहेच.