भारतीय जनता पक्षामध्ये(भाजप) सुरू असलेल्या अडवाणींच्या नाराजी नाट्यावर काँग्रेसने टीका करण्यास सुरूवात केली आहे.
काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असल्याचे वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी मतदार संघ निवडण्याच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस अडवाणी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर अडवाणींची मनधरणी करण्याचाही सिलसिला भाजप नेत्यांकडून सुरू होता.
आपल्या इच्छेनुसार अडवाणींना यावेळी लोकसभेसाठी भोपाळ मतदार संघ हवा होता. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या निर्णयानुसार अडवाणी यांना नेहमीच्या गांधीनगर याच मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली गेली. अखेर अडवाणी यांनीही गांधीनगरमधून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले.
याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिब्बल म्हणाले की, मोदी काय म्हणतात, हेच आज सर्वत्र दाखविले जात आहे. भाजपच्या इतर नेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अडवाणींविषयी मला सहानुभूती वाटते.  

Story img Loader