आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तापले असतानाच केंद्रीय दुरसंचार मंत्री कबिल सिब्बल आता फेसबुकच्या माध्यमातून सोशल साईटसवरील युद्धात उतरले आहेत. विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरविल्या जाणा-या खोट्या माहितीचा आणि अफवांचा प्रतिवाद करण्यासाठी सिब्बल यांनी आपले फेसबुक अकाऊंट उघडल्याचे समजते. निवडणुकांच्या दृष्टीने आपण प्रचार करत असलेल्या उमेदवारांबद्दल खरी आणि योग्य माहिती मतदारांपर्यंत पोहचण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसकडून यापूर्वीसुद्धा सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधकांचा सामना करण्यासाठी मंत्र्यांची नेमणूक केली गेली आहे. देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत फक्त माझ्याबद्दलच नाही तर सरकारने आजवर केलेल्या विकासकामांबद्दलची योग्य माहिती पोहचवण्याचा प्रयत्न फेसबुकच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती कबिल सिब्बल यांनी दिली.

Story img Loader