पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला राज्यसभेत प्रत्युत्तर देत काँग्रेससह गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला ते रेल्वे स्टेशन काँग्रेसनेच बांधलं होतं, असं म्हणत सिब्बल यांनी मोदींवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपिल सिब्बल म्हणाले, “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे मोदींनी निवडणुकीच्या मैदानातील भाषण केलं. मला देखील मोदींना इतिहास समजाऊन सांगायचा आहे. मोदी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते ते रेल्वे स्टेशन काँग्रेसने तयार केलं होतं. जर काँग्रेसने ते रेल्वे स्टेशनच तयार केलं नसतं तर मोदींनी चहा कसा विकला असता.”

“आयआयटी आणि आयआयएम या संस्था मोदींनी नाही, तर काँग्रेसने निर्माण केल्या होत्या,” असंही सिब्बल यांनी म्हटलं.

मोदींनी राज्यसभेत काँग्रेसवर नेमकी काय टीका केली?

गोव्यात विधानसभा निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आणत काँग्रेसवर आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी ह्रदयनाथ मंगेशकर यांना सावकरांची कविता सादर करण्यात आल्याने नोकरीवरुन काढून टाकलं होतं सांगत स्वांतंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत अशी टीका केली.

हेही वाचा : “मेरे लिए चले थे क्या..”, करोना काळातील कामगारांच्या स्थलांतरावरून काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

“लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झाला आहे. लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील आहे. पण त्यांच्या कुटुंबासोबत कशाप्रकारे अन्याय केला हेदेखील देशाला समजलं पाहिजे. लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

Goa Election : काँग्रेसमुळे गोव्याला स्वातंत्र्य उशीरा मिळाले, पंतप्रधान मोदी यांची टीका

“जेव्हा ते सावरकरांना भेटले तेव्हा कवितेला चाल लावण्याबद्दल सांगितलं होतं. त्यावर सावरकरांनी हृदयनाथ यांना माझी कविता सादर करुन जेलमध्ये जायचंय का? अशी विचारणा केली होती. यानंतर हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेला संगीतबद्ध केलं होतं. त्यानंतर आठ दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वांतंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत,” अशी टीका नरेंद्र मोदींनी यावेळी केली.

“भारत स्वतंत्र झाल्यानंतर १५ वर्षांनी गोवा मुक्त झाला. सरदार वल्लभाई पटेल यांनी हैद्राबाद, जुनागढसाठी रणनिती बनवली, पावले उचचलली, तशी प्रेरणा घेत गोव्यासाठी रणनिती बनवली असती तर गोव्याला १५ वर्षे गुलामीत रहावं लागलं नसतं” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर आणि तत्कालीन धोरणांवर केली.