पीटीआय, नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी देशातील अन्यायाचा सामना करण्यासाठी इन्साफ या मंचाची स्थापना करण्याची घोषणा केली. देशातील विरोधी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री यांच्यासह सर्वानी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन सिबल यांनी केले. या मंचातर्फे ११ मार्चला जंतर मंतर येथे सार्वजिक सभा आयोजित केली जाईल असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अन्याय होत आहे, नागरिक, संस्था, राजकीय विरोधक, पत्रकार, शिक्षक, आणि मध्यम व लघु उद्योगांना अन्यायाचा सामना करावा लागतो असे सिबल म्हणाले. सामान्य लोक आणि वकील एकत्र येऊन अन्यायाविरोधात लढा देतील अशी कल्पना त्यांनी मांडली. भरपूर विचारमंथन करून ‘इन्साफ’ मंच स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. त्यासाठी इन्साफ का सिपाही ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे, त्यावर कोणीही नाव नोंदवू शकतो अशी माहिती सिब्बल यांनी दिली. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली, ईडीचा वापर करून राजकीय विरोधक संपवले जात असल्याचे ते म्हणाले. कपिल सिबल हे नावाजलेले वकील असून अनेक वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. गेल्या वर्षी ते पक्षातून बाहेर पडले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sibbal insaf manch calls for support for all opposition ysh