काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशातून भाजपावर हल्लाबोल करताना दिसत आहे. यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच कर्नाटकमधील एका भाजपा नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतिल यांनी केलं आहे.
रामनगरा येथे रविवारी भाजपाच्या ‘जन संकल्प यात्रे’त नलिन कुमार कतिल बोलत होते. यावेळी राहुल गांधींबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. “राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांनी लोकांना करोनाची लस न घेण्याचं आवाहन केलं होतं. लस घेतल्याने मुलं होणार नाहीत. अपंगत्व येऊ शकतं, असं सांगत होतं,” अशी टीका नलिन कुमार कतिल यांनी केली.
हेही वाचा : नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, प्रसिद्ध केला व्हिडीओ
आमदार मंजुनाथ यांनी केलेल्या विधानाचा दाखला देत नलिन कुमार कतिल म्हणाले, “मुलं होतं नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले आहेत.” निलम कुमार कतिल यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सूरजेवाला यांनी कतिल यांना ‘जोकर’ म्हटलं आहे.
हेही वाचा : इराणी बोटीतून ४२५ कोटींचं ड्रग्ज जप्त, पाच जणांना अटक; गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दलाची धडक कारवाई
“कर्नाटक ‘भाजपाच्या सर्कसमधील जोकर’ शाब्दिक जुलाबाने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी अशी विधान करतात. त्यांना गांभीर्याने घेऊ नये,” असं प्रत्युत्तर रणदीर सुरजेवाला यांनी दिलं आहे.