हुबळी: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपलाच आव्हान दिले आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना निवडणूक लढवू नये असे निर्देश दिले होते. त्यावर शेट्टर यांनी नाराजी व्यक्त करत, पक्षाचा निर्णय मान्य नाही असे बजावले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे ते आमदार आहेत. पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली होती. त्यावर पक्षाने नवोदितांसाठी संधी म्हणून रिंगणातून माघार घेण्यास सांगितले. मात्र पक्षाने निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहन ६७ वर्षीय शेट्टर यांनी केले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष तसेच माजी विधानसभा अध्यक्ष असलेल्या शेट्टर यांनी उत्तर कर्नाटकमध्ये गेली तीन दशके भाजपच्या वाढीत योगदान दिल्याचे सांगितले. पक्षाने दोन ते तीन महिन्यांपूर्वी सांगितले असते तर, मान्य केले असते. मात्र आता अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस असताना रिंगणातून माघार घेण्यास सांगणे हे अपमानस्पद आहे. त्यामुळे दुखावलो गेल्याचे शेट्टर यांनी स्पष्ट केले. मी निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाला सांगितले आहे. सहा वेळा २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्याचे शेट्टर यांनी नमूद केले.
भाजप नेते ईश्वरप्पा राजकारणातून निवृत्त
नवी दिल्ली : कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे व १० मे रोजी होणारी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे कळवले. कन्नडमध्ये लिहिलेल्या आपल्या संक्षिप्त पत्रात ईश्वरप्पा यांनी आपण स्वेच्छेने हा निर्णय घेत असल्याचे कळवले. ईश्वरप्पा आपली वक्तव्ये आणि आरोपांमुळे अनेकदा वादग्रस्त ठरले होते. ईश्वरप्पा जूनमध्ये ७५ वर्षांचे होतील. भाजपमधील नेत्यांसाठी निवडणूक लढवण्याची आणि अधिकृत पदे भूषवण्याची ही वयोमर्यादा असल्याचा संकेत आहे.
देवेगौडा कुटुंबातील मतभेद तीव्र
हुबळी/हासन (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हासन येथील उमेदवारीवरून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील निर्माण झालेला कलह मंगळवारी आणखी वाढला. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि विधिमंडळ पक्षाचे प्रमुख एच. डी. कुमारस्वामी यांनी या संघर्षांस महाभारतातील ‘कुरुक्षेत्रा’ची उपमा दिली. काही शकुनीह्ण आपला भाऊ एच. डी. रेवण्णाची चुकीचा सल्ला देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.
पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, की आपले मोठे बंधू व माजी मंत्री रेवण्णाचे मन आमचे वडील, धर्मनिरपेक्ष जनता दल प्रमुख एच. डी. देवेगौडा वळवू शकले नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. रेवण्णा यांच्या पत्नी भवानी रेवण्णा या वादाच्या मूळ कारण ठरल्या आहेत. त्यांना हासन येथून निवडणूक लढायची आहे आणि हाच वादाचा विषय बनला आहे. कुमारस्वामी यांनी हासन येथून भवानी यांना उमेदवारी दिली जाणार नाही व पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांला येथील उमेदवारी दिली जाईल, असे वारंवार स्पष्ट केले आहे. तरीही भवानी यांनी माघार घेतलेली नाही. भवानी रेवण्णा या हासन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. राजकारणात त्यांचा आपले पती व पुत्र हासनचे खासदार प्रज्ज्वल आणि विधान परिषदेचे आमदार सुरज रेवण्णा यांना सक्रिय पािठबा असतो.
हासन येथून पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांस उमेदवारी द्यावी, याचा पुनरुच्चार करून कुमारस्वामी यांनी याबाबत तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, की मी दीड वर्षांपूर्वीच हे स्पष्ट केले होते, की हासन येथून भाजप उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर देवेगौडा कुटुंबातील सदस्याने ही निवडणूक लढवू नये. साधा कार्यकर्ता उभा करून लढण्याची पक्षाची क्षमता आहे.
‘देवेगौडाही मन वळवण्यात अपयशी!’
रेवण्णा कुटुंबाला उद्देशून कुमारस्वामी म्हणाले, की देवेगौडा कुटुंबाचे हितचिंतक असल्याचे भासवणाऱ्यांना जपण्याचा प्रयत्न तुम्ही चालवला आहात. परंतु प्रत्यक्षात आपल्याला संपवण्याचा त्यांचा हेतू आहे. माझा नाईलाज आहे. देवेगौडांनी रेवन्ना यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले, की त्यांनी प्रयत्न केला, पण त्यात तेही हतबल ठरले. हे आमचे दुर्दैव आहे काय करावे?