कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्यात प्रमुख लढत होत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकीबद्दल भाष्य केले आहे. कर्नाटकात काँग्रेसला जिंकण्याची संधी आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते ‘एनडीटीव्ही इंडिया’शी बोलत होते.

कर्नाटक आणि अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकांबद्दल तुमचं मत काय? असा विचारले असता शरद पवार म्हणाले, “देशात दोन प्रकारच्या निवडणुका होत असतात. एक राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर. माझे व्यक्तिगत मत असे आहे की, राज्याच्या निवडणुका वेगळ्या असतात. तुम्ही देश आणि राज्य बघाल तर, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. तसेच, आता कर्नाटकातही काँग्रेसचा विजय निश्चित आहे.”

Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Sadabhau Khot and Sharad Pawar
Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”

हेही वाचा : “हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसतं, या कंपनीचं नावही…”, शरद पवारांचं मोठं विधान

“मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार होते, तर कमलनाथ मुख्यमंत्री होते. पण, आमदार फोडून भाजपाने तिथे सरकार स्थापन केले. आता मध्य प्रदेशात निवडणुका झाल्यास परिस्थिती बदलू शकते. राजस्थान, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये बिगर भाजपा सरकार आहे. देशात राष्ट्रीय निवडणुका येतील, तेव्हा आम्ही सर्वजण मिळून काहीतरी करू, तर चित्र वेगळे असेल. मात्र, भाजपाकडे दुर्लक्ष करणे इतके सोपे राहणार नाही,” असेही शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : ”विमानातून मुंबईत उतरल्यावर धारावीच्या झोपडपट्ट्या दिसतात, पण आता…” शरद पवार म्हणाले, ‘विकास…’

दरम्यान, अलीकडे सी-व्होटर आणि एबीपी न्यूजचा सर्व्हे समोर आला होता. त्यात सत्ताधारी भाजपाला धक्का बसणार असून, काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली होती. सर्व्हेनुसार, कर्नाटकात काँग्रेसला ११५-१२७ जागा मिळू शकतात. भाजपाला ६८-८० आणि जनता दल धर्मनिरपेक्षला २३-३५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.