Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसबा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आता कर्नाटकात बहुमताचं सरकार स्थापन करेल. कानडी जनतेनं भाजपा आणि जेडीएसऐवजी काँग्रेसच्या बाजूनै कौल दिला आहे. काँग्रेस कर्नाटकात १३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाला केवळ त्याच्या निम्म्या जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटकमधल्या जनतेनं सत्ताधारी भाजपाच्या अनेक आमदारांना आणि मंत्र्यांना यावेळी पसंती दर्शवली नाही. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधील तब्बल १२ आमदारांचा पराभव निश्चित आहे.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची आज (१३ मे) मतमोजणी सुरू आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार कर्नाटकात काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ६४ आणि जेडीएसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे. तसेच ४ जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका

भाजपाचे १३ मंत्री पराभूत

१. मुधोला विधानसभा मतदार संघ
गोविंदा करजोला पराभूत, आरबी थिम्मापुरा विजयी

२. बेल्लारी ग्रामीण विधानसभा मतदार संघ

श्रीरामुलु पराभूत, बी नागेंद्र विजयी

३. वरुणा विधानसभा मतदार संघ
व्ही. सोमण्णा पराभूत, सिद्धारमैय्या विजयी

४. कामराजनगर विधानसभा मतदार संघ
वी सोमन्ना पराभूत, पुट्टारंगशेट्टी विजयी

५. चिक्कनायकनहल्ली विधानसभा मतदार संघ
जे. सी. मधुस्वामी पराभूत, सुरेश बाबू विजयी

६. बायलागी विधानसभा मतदार संघ
मुरुगेश निरानी पराभूत, जे. टी. पाटील विजयी

७. हिरेकेरुरु विधानसभा मतदार संघ
बी. सी. पाटील पराभूत, यूबी बनकर विजयी

८. चिक्काबल्लापूर विधानसभा मतदार संघ
डॉ. के. सुधाकर पराभूत, प्रदीप ईश्वर विजयी

९. होसकोटे विधानसभा मतदार संघ
एम.टी.बी. नागराज पराभूत, शरत बचेगौडा विजयी

१०. के. आर. पेट विधानसभा मतदार संघ
नारायणगौडा पराभूत, एच.टी. मंजू विजयी

११. तिपातूर विधानसभा मतदार संघ
बी. सी. नागेश पराभूत, के. शदाक्षरी विजयी

हे ही वाचा >> VIDEO : कर्नाटकचा विजय साजरा करणं पडलं महागात! फटाक्यांची आतषबाजी करताना थोडक्यात बचावला काँग्रेस नेता; नेमकं घडलं काय?

१२. येलबुर्गा विधानसभा मतदार संघ
हलप्पा अचार पराभूत, बसवराज रायरेड्डी विजयी

१३. नवलगुंडा विधानसभा मतदार संघ
शंकर मुनेकोप्पा पराभूत, एनएच कोनरेड्डी विजयी

Story img Loader