कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. पण त्यांचा मुलगा यथिंद्रा सिद्धरामय्याने वरुणा विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा हा सिद्धारामय्या यांचा बालेकिल्ला पण मुलासाठी त्यांनी हा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला.

यथिंद्राने वरुणामधून भाजपाच्या थोतादाप्पा बसावाराजू यांच्यावर ४५ हजार मतांनी विजय मिळवला. सिद्धारामय्या यांनी वरुणाऐवजी शेजारच्या चामुंडेश्वरमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. विजयाची खात्री नसल्याने ते चामुंडेश्वर बरोबर बदामीमधूनही निवडणूक लढवत होते. त्यांच्या या निर्णयावर जोरदार टीकाही झाली होती. सिद्धरामय्या यांनी यापूर्वी चामुंडेश्वरीमधून निवडणूक लढवली आहे पण

२००८ सालपासून ते वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. चामुंडेश्वरीमध्ये सिद्धारामय्या पराभूत झाल असले तरी बागलकोट जिल्ह्यातील बदामीमधून त्यांनी विजय मिळवला आहे. बदामीमधून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्या श्रीरामलु यांचा चार हजार मतांच्या फरकाने पराभव केला.

Story img Loader