Karnataka Election 2023 Date: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणात एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि त्यांची रद्द झालेली खासदारकी यावर जोरदार चर्चा चालू असताना दुसरीकडे भाजपाचं बहुमताचं सरकार असणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचीही चर्चा पाहायला मिळाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी भाजपा आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांसमवेतच अनेक प्रादेशिक पक्षांनीही कंबर कसली आहे. विशेषत: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नामुळे बेळगाव, निपाणीसह सीमाभागातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

२२४ जागांसाठी होणार मतदान

कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील. १३२० मतदान केंद्र पूर्णपणे महिलांकडून सांभाळली जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली.

विश्लेषण : कर्नाटकातील मुस्लीम आरक्षणाचा वाद काय आहे?

असा असेल निवडणूक कार्यक्रम

नोटिफिकेशन – १३ एप्रिल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल
अर्ज छाननी – २१ एप्रिल
अर्ज माघारी घेण्याची मुदत – २४ एप्रिल
मतदानाची तारीख – १० मे
मतमोजणी आणि निकालाची तारीख – १३ मे

Karnataka Election Timetable
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे आता काँग्रेस-भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातून भाजपा, काँग्रेस, ठाकरे गटाचे स्टार प्रचारक बेळगाव, निपाणीसह सीमाभागात आक्रमक प्रचार करताना दिसत आहेत. हे स्टार प्रचारक कर्नाटकमधील भाषणांमधून महाराष्ट्रातील विरोधकांवरही टीका करताना पाहायला मिळत आहेत.

कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या २२२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी बहुमतापासून त्यांना दूर राहावे लागले. काँग्रेसने ७८ तर जेडीएसने ३७ जागा मिळवल्या होत्या. तर बहुजन समाज पक्ष १, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे इतर उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा आकडा ११२ असल्यामुळे २०१८ साली विधानसभा त्रिशंकू झाली होती. कर्नाटक विधानसभेच्या मागच्या काही निवडणुकांचा कल पाहिला तर कोणत्याही पक्षाला आपल्या सलग दोन निवडणुकीत बहुमत मिळवता आलेले नाही. २००८ साली भाजपाने ११० जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. तर २०१३ साली काँग्रेसने १२२ जागा जिंकून सरकार स्थापन केले. त्यानंतर पुन्हा २०१८ साली सुरुवातीला भाजपा, त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आणि त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन झाले होते.

Story img Loader