कर्नाटक येथील एका कालव्यात बस कोसळून २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील मांड्या येथे एक भरधाव बस कावेरी नदीला जोडलेल्या कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी या अपघाताबद्दल माहिती दिली आहे.
या घटनेबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी खेद व्यक्त केला आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या घटनेची चौकशी करण्यात येईल असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. या अपघाताबद्दल केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही शोक व्यक्त केला आहे.
ಕನಗನಮರಡಿಗೆ ಸಿಎಂ|ಚಲನಚಿತ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭ ಮುಂದಕ್ಕೆ
_
ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಮ್ಮ ಇಂದಿನ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನೂ ರದ್ದುಪಡಿಸಿ ಪಾಂಡವಪುರ- ಕನಗನಮರಡಿ ಗ್ರಾಮದ ಬಸ್ ಅಪಘಾತ ನಡೆದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಲಿದ್ದಾರೆ.ಇಂದು ಸಂಜೆ ನಡೆಯಬೇಕಿದ್ದ ರಾಜ್ಯ ಚಲನಚಿತ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭ ಮುಂದೂಡುವಂತೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ pic.twitter.com/eahedQWKUl— CM of Karnataka (@CMofKarnataka) November 24, 2018
Preliminary reports have suggested that more than 20 people have lost their lives & the accident may be due to negligence of the driver. Officials & doctors will ensure immediate treatment to all those injured.
— Siddaramaiah (@siddaramaiah) November 24, 2018
मांड्या जिल्ह्यातून कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात खासगी बस कोसळली या घटनेत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात स्थळी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं. ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला अशी माहिती मिळते आहे.