कर्नाटकमधील भाजपा आमदार के एस ईश्वरप्पा यांनी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर ईश्वरप्पा यांना धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रामध्ये त्यांना जर पुन्हा टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू असं धमकावण्यात आलं आहे. हे पत्र त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यदिनी टिपू सुलतान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेले बॅनर लागल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी आपण सर्व मुस्लीम गुंड असल्याचं म्हटलेलं नसून, आपण कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचं सांगितलं आहे.

सावरकर आणि नेहरू; कर्नाटकात रंगला इतिहासावरून राजकीय वाद

मंगळवारी ईश्वरप्पा यांनी अल्पसंख्यांकांमुळे कर्नाटकतील शिवमोग्गा येथे जातीय तेढ निर्माण झालं असल्याचा आरोप केला. “मला मुस्लीम समाजातील ज्येष्ठांना सांगायचं आहे. सर्वच मुस्लीम गुंड आहेत असं माझं म्हणणं नाही. मुस्लीम समाजातील ज्येष्ठांनी भुतकाळात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गुंडगिरीत सहभागी होणाऱ्या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन करावं असा माझा सल्ला आहे. अन्यथा सरकार यावर कारवाई करेल आणि त्यांना या कारवाईचा सामना करावा लागेल,” असं ईश्वरप्पा म्हणाले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फलकास आक्षेप, शिवमोगात तणाव ; एकावर शस्त्राने हल्ला, संचारबंदीचे आदेश

स्वातंत्र्यदिनी टिपू सुलतानचं समर्थन करणाऱ्या जमवाने अमीर अहमद सर्कल येथे लावण्यात आलेलं वीर सावरकरांचं पोस्टर हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर वातावरण चिघळलं असून कर्फ्यू लावण्यात आला आहे. १६ ऑगस्टला बंगळुरु मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने सावरकरांचं चित्र झळकावल्याने या वादात भर पडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka bjp ks eshwarappa tipu sultan muslim gunda veer savarkar sgy