Karnataka BJP Leadership Feud : येत्या काही दिवसांत कर्नाटकात भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदार बसनगौडा यत्नल पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्या गटांमधील अंतर्गत संघर्ष वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यत्नल गट गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटून राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहे, तर विजयेंद्र गट भाजपा पक्षांतर्गत निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये बैठक घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, लवकरच चांगली बातमी येणार असल्याचा दावा यत्नल गटाकडून केला जात असून, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्या यांना माजी राज्यमंत्री बी श्रीरामुलू यांचे कडवे आव्हान असणार असल्याचे म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री जी एम सिद्धेश्वर यांनी बुधवारी दिल्लीत सांगितले की, लवकरच “हाय कमांड चांगली बातमी देईल.” यावर त्यांना “चांगली बातमी” काय आहे असे विचारले असता, त्यांनी जास्त काही न बोलता उत्तर दिले की, “तुम्हाला समजू शकते की ही चांगली बातमी काय असेल.”

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी एल संतोष यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या यत्नल गटाने विजयेंद्र यांची जागी श्रीरामुलू यांची निवड करण्याचा सल्ला दिला होता. जानेवारीमध्ये झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माजी मंत्री विजयेंद्र यांच्याशी मतभेद झाले होते.

…तर भाजपला कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत

विजयेंद्र गटाची १२ फेब्रुवारी बैठक होणार असल्याच्या वृत्ताला, माजी राज्यमंत्री एम.पी. रेणुकाचार्य यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही हायकमांडकडे आमचे काही प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीला जाणार आहोत. जर विजयेंद्र यांना राजीनामा द्यावा लागला तर भाजपला कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत. राष्ट्रीय नेत्यांना या परिस्थितीची जाणीव आहे. ते विजयेंद्र यांना हटवणार नाहीत आणि अध्यक्षपदी तेच कायम राहतील.”

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हायकमांडने निवडलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू आहेत.” याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या श्रीरामुलु यांची विधाने आगीत तेल ओतणारी होती. “जर पक्षाने मला संधी दिली तर मी प्रदेशाध्यक्षपदाची भूमिका पार पाडण्यास तयार आहे. मी पक्षातील गटबाजी संपवून टाकेन आणि २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत १५० जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन,” असे श्रीरामुलु यांनी बुधवारी कोलार येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले.

कोण आहे श्रीरामुलु?

खाण उद्योजक आणि भाजपा नेते गली जनार्दन रेड्डी यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे श्रीरामुलु यांचे भाजपाशी घट्ट नाते आहे. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत सुषमा स्वराज यांचे सहकारी म्हणून काम केले होते. त्यावेळी त्यांनी बेल्लारीतून विजय मिळवला होता. ते २००८ मध्ये पहिल्यांदा आमदार आणि मंत्री झाले. यानंतर त्यांनी त्यांचे गुरू रेड्डी यांच्यावर बेकायदेशीर संपत्ती मिळवल्याचा आरोप करत तीन वर्षांनंतर मंत्रिपद तसेच भाजपाचाही राजीनामा दिला होता.

पुढे २०११ मध्ये, श्रीरामुलु यांनी बीएसआर काँग्रेसची स्थापना केली. पण, २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. परंतु, असे म्हटले जाते की त्यांच्यामुळे भाजपाच्या किमान ४० जागांवर परिणाम झाला. २०१३ मध्ये, त्यांनी आपला पक्ष भाजापमध्ये विलीन केला आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बेल्लारी येथून विजय मिळवला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ते मोलाकलमुरु येथून जिंकले परंतु बदामी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून पराभूत झाले. पाच वर्षांनंतर, ते बेल्लारी विधानसभा मतदारसंघातून २९,००० पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले होते.