Karnataka BJP MLA Basangouda Patil Yatnal Criticize Ranya Rao : दाक्षिणात्य अभिनेत्रा रान्या राव हिच्याबाबत कर्नाटकातील भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांनी अत्यंत अश्लील टिप्पणी केली आहे. तिने शरीरात जागा मिळेल तिथे सोनं लपवून ठेवलं होतं, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रान्या राव सध्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटकेत आहे. याबाबत कर्नाटकचे भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील यटनाल म्ङणाले, तिच्या संपूर्ण शरारीत सोनं होतं. जिथं जिथं छिद्र होतं, तिथं तिनं सोनं लपवून ठेवलं होतं.” या प्रकरणात राज्याचे मंत्री सामील असल्याचा दावाही यटनाल यांनी केला आणि विधानसभेच्या अधिवेशनात त्यांची नावे सांगणार असल्याचे सांगितले.

रान्या रावला सुरक्षा कोणी दिली?

“या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व मंत्र्यांची नावे मी विधानसभेच्या अधिवेशनात सांगेन. तिच्या नातेसंबंधांबद्दल, तिला सुरक्षा मिळवून देण्यात कोणी मदत केली आणि सोने कसे आणले याबद्दल मी संपूर्ण माहिती गोळा केली आहे. तिने सोने कुठे लपवले आणि ते कसे तस्करी केले यासह मी अधिवेशनात सर्वकाही उघड करेन,” असे आमदार पुढे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव हिला ३ मार्च रोजी दुबईहून परतताना बेंगळुरू विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या १४.२ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आणि २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. तेव्हापासून तिला अटक करण्यात आली आहे आणि ती कोठडीत आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि इतर एजन्सींनी केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की राव यांनी या वर्षी किमान २७ वेळा दुबईला प्रवास केला आणि विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करून प्रत्येक ट्रिपमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. तथापि, विमानतळ प्रोटोकॉल अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की त्यांनी रान्या राव यांचे वडील, डीजीपी रामचंद्र राव यांच्या थेट सूचनांनुसार काम केले.

तथापि, अभिनेत्रीने हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि म्हटले आहे की दुबईहून परतल्यावर तिच्यावर १४ किलोपेक्षा जास्त सोन्याची तस्करी केल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता. डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात तिने आरोप केला आहे की अधिकाऱ्यांनी तिला कानाखाली मारली आणि रिकाम्या कागदावर सह्या करायला लावल्या.