कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या वापरत असलेले घड्याळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातातील हिरेजडीत घड्याळाविषयी कर्नाटकमधील जनता दल (एस) चे नेता कुमारस्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कुमारस्वामींनी केलेल्या दाव्यानुसार सिद्धरामय्या वापरत असलेल्या घड्याळाची किंमत ६८ लाख ५६ हजार असून, कस्टम ड्यूटीसह या घड्याळाची किंमत ७० लाख इतकी होते. सिद्धरामय्यांच्या गॉगलची किंमत दोन लाख रुपये असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. याबाबत सिद्धरामय्या यांना विचारले असता, हा गॉगल मी पन्नास हजारात विकायला तयार असून, दहा लाखात घड्याळसुध्दा विकायला तयार असल्याचे ते म्हणाले. सिद्धरामय्या यांनी ‘केएसआयसी’च्या शो-रुममधून पत्नीसाठी खरेदी केलेली एक लाख नऊ हजार किंमतीच्या वॉटरप्रुफ सिल्क साडीचे वृत्त मागील महिन्यात माध्यमांमधून झळकले होते.

Story img Loader