कर्नाटकात अखेर काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची तर, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची काल (२० मे) शपथ घेतली. तसंच, त्यांच्यासोबत आठ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे. परंतु, या मंत्रिमंडळात सर्वाधिक ज्येष्ठ नेते आहेत. तर फक्त आठवी पास झालेले मंत्रीही या मंत्रिमंडळात आहेत.

काँग्रेसने आठपैकी तीन मंत्र्यांना बेंगळुरू विभागातून, दोन म्हैसूरमधून आणि उर्वरित तीन मंत्र्यांना कल्याण कर्नाटक आणि मुंबई कर्नाटक विभागातून मंत्रिपदे दिली आहेत. सिद्धरामय्या मंत्रिमंडळातही अहिंदा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात तीन दलित, दोन अल्पसंख्याकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय एक लिंगायत आणि एक वोक्कलिगा प्रवर्गातील आमदारालाही मंत्रिपद देण्यात आलं आहे.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Chandrasekhar Bawankule , Chandrasekhar Bawankule bjp state president,
प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे तूर्तास कायम? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत संघटनात्मक घडी राखण्याचे प्रयत्न
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप

हेही वाचा >> काँग्रेसने शब्द पाळला, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘फाइव्ह गॅरंटी’बाबत महत्त्वपूर्ण आदेश; नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणाले…

ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचा सहभाग आहे. या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६३.७ वर्षे आहे. मुख्यमंत्र्यांसह १० पैकी पाच मंत्र्यांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे. सीएम सिद्धरामय्या आणि केएच मुनियप्पा हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. दोघेही ७५ वर्षांचे आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे हे सर्वात तरुण मंत्री आहेत. त्यांचं वय ४४ वर्षे आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार ६० वर्षांचे आहेत. जी परमेश्वरा यांचे वय ७२, जमीर अहमद यांचे ५५, एम.बी. पाटील यांचे ५८ आणि केजे जॉर्ज यांचे वय ७३ आहे. सतीश ६० वर्षांचे आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

कर्नाटकातील १० पैकी सहा मंत्री पदवीधर किंवा त्याहून अधिक आहेत. बारावीपेक्षा कमी शिकलेले चार मंत्रीही आहेत. सर्वात कमी शिकलेले एकमेव मुस्लिम मंत्री बी.जे. जमीर आहेत. जमीर आठवी पास आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनीही दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. केजे जॉर्ज आणि सतीश जारकीहोळी यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. जी परमेश्वराने यांनी सर्वाधिक शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून कृषी विषयात डॉक्टरेट केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे कायद्याची पदव्युत्तर पदवी आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही पद्वुत्तर शिक्षण घेतलं आहे.

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक नेत्यांचाही समावेश आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, कर्नाटक मंत्रिमंडळात खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सर्वाधिक गुन्हेगारी प्रकरणे आहेत. उपमुख्यमंत्र्यांवर १९, तर सिद्धरामय्या यांच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. केजे जॉर्ज हे मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री आहेत ज्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यानंतर प्रियांक खर्गे यांच्यावर सर्वाधिक नऊ गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >> विरोधकांच्या एकीचा ‘बंगळुरू प्रयोग’ देशभर यशस्वी होणार का?

मंत्रिमंडळ श्रीमंत

सिद्धरामय्या यांचे मंत्रिमंडळ कोट्यवधींनी श्रीमंत आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व १० मंत्र्यांची एकूण संपत्ती दोन हजार कोटींहून अधिक आहे. सर्वात श्रीमंत उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आहेत. शिवकुमार यांच्याकडे एकूण एक हजार १३ कोटींहून अधिक संपत्ती आहे. प्रियांक खरगे यांच्या नावावर सर्वात कमी १६ कोटींची संपत्ती आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण ५१ कोटींची संपत्ती आहे. डीके शिवकुमार यांच्याशिवाय असे तीन मंत्री आहेत ज्यांची संपत्ती १०० कोटींहून अधिक आहे.

Story img Loader