कर्नाटक काँग्रेसच्या एका नेत्याला धारवाड जिल्ह्यातील त्याच्या सलूनमध्ये एका कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ब्युटीशियन म्हणून काम करणाऱ्या महिलेने तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपी मनोज करजगी शनिवारी सलूनमध्ये आला आणि त्याने तिला मिठी मारून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने तिच्या प्रियकराला याची माहिती दिली, त्याने इतर दोन मित्रांसह घटनास्थळी पोहोचून काँग्रेस नेत्याला मारहाण केली.

पोलिसांनी एनडीटीव्हीला माहिती दिली की महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपांसह लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तो उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे संचालकही होता. याशिवाय माजी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्याचे फोटोही समोर आले आहेत. तर हा नेता एका मंत्र्याचा माजी सहकारी होता आणि पक्षाच्या कार्यात सहभागी होता, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

Story img Loader