कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये एका व्यक्तीने चक्क स्वतःचंच गुप्तांग कापल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. या घटनेनंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. हे कृत्य केलं त्यावेळी हा व्यक्ती दारुच्या नशेत होता असं वृत्त आहे.
बेंगळुरूच्या सोलादेवानाहल्ली येथे ही घटना घडलीये. ननजप्पा(वय 57) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो मजुर होता आणि दारुचा व्यसनी होता. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी उठल्यापासून तो दारू प्यायला बसला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचा मुलगा कामावरुन परतल्यावर तुमच्या घरातून तुझ्या वडिलांचा किंचाळण्याचा आवाज आला असं त्याला शेजाऱ्यांनी सांगितलं. घरात गेल्यावर समोरचं दृष्य पाहून तो हबकलाच. त्याच्या वडिलांनी स्वतःचं गुप्तांग कापलं होतं आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता.
तातडीने त्याने वडिलांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. वडिलांनी असं कृत्य का केलं याबाबत काहीच माहिती नाही असं त्याने सांगितलं. स्वयंपाक घरातील चाकूने त्याने गुप्तांग कापल्याचं समजतंय.