अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या बेंगळुरुतील कार्यालयावर गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असून परकीय देणगी नियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

बेंगळुरुत अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेचे कार्यालय सुरु असून गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास या कार्यालयावर ईडीच्या पथकाने छापा टाकला. रात्री उशीरापर्यंत ईडीचे पथक कार्यालयात उपस्थित होते. परकीय देणगी नियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईबाबत अद्याप ईडीने सविस्तर माहिती दिलेली नाही. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ ही मानवाधिकार क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेने अॅम्नेस्टीवर राजद्रोहाचा आरोप झाला होता.

काही दिवसांपूर्वी ईडीने ग्रीनपीस या संघटनेच्या कार्यालयांवर छापा टाकला होता. या विरोधात ग्रीनपीसने न्यायालयात धाव घेतली होती. परकीय देणगी नियम कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन करणा-या बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांवर (एनजीओ) केंद्र सरकारने यापूर्वीही कारवाई केली आहे.

Story img Loader