जनमत चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजांप्रमाणे कर्नाटकात भारतीय जनता पक्ष सत्तेवरून पायउतार झालाय.  कन्नड मतदारांनी भाजपला नाकारलंय. राज्यात कॉंग्रेस पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले असून, आता मुख्यमंत्री कोण याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेस पक्षाने  राज्यात १२१ जागांवर विजय मिळवला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला ४१ जागांचा फायदा झाला आहे.  जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षानेही जनमत चाचण्यांचा अंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केलीये. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत पक्षाला १२ जागांचा फायदा झाला. 
भाजपला या निवडणुकीत सपाटून मार खावा लागलांय. पक्षाला कन्नडींगा मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला ७० जागांचे नुकसान झाले असून, पक्षाचे केवळ ४० आमदार निवडून आले आहेत.
पक्षांचे अंतिम बलाबल
कॉंग्रेस 
विजयी – १२१

जनता दल (धर्मनिरपेक्ष)
विजयी – ४०

भाजप
विजयी – ४०
कर्नाटक जनता पक्ष
विजयी ६
इतर
विजयी – १६

कॉंग्रेसमध्ये आनंद
निकालांनतर कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून निकालांचे स्वागत केले. कॉंग्रेस राज्यात स्थिरआणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देईल, असे आश्वासन पक्षाचे राज्यातील नेते सिद्धरामय्या यांनी दिले. भाजप हा भ्रष्ट पक्ष आहे. त्यांनी राज्यामध्ये गेल्या पाच वर्षांत घोटाळ्यांशिवाय दुसरे काहीच केले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Story img Loader