सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करताच विरोधी बाकांवर बसलेले काँग्रेस आणि जेडीएस आमदारांचे चेहरे उत्साहाने फुलले. येडियुरप्पांचे भाषण संपताच कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांनी परस्परांशी हस्तांदोलन केले आणि प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना विजयीमुद्रेच्या खूणा केल्या.
येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. २२२ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११२ ही मॅजिक फिगर आवश्यक आहे. काँग्रेस आणि जेडीएसकडे एकत्रित संख्याबळ ११५ आहे. भाजपाकडे एकूण १०४ आमदार आहेत.
जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असतील. मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन असे सांगत येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला.
Bengaluru: Congress' DK Shivkumar, JD(S)'s HD Kumaraswamy & other MLAs at Vidhana Soudha after resignation of BJP's BS Yeddyurappa as Chief Minister of Karnataka. pic.twitter.com/qdGu8zGXWK
— ANI (@ANI) May 19, 2018
Bengaluru: Congress' DK Shivkumar, JD(S)'s HD Kumaraswamy & other MLAs at Vidhana Soudha after resignation of BJP's BS Yeddyurappa as Chief Minister of Karnataka. pic.twitter.com/wZ6FH05jrQ
— ANI (@ANI) May 19, 2018