महाविद्यालय हे सौंदर्य स्पर्धचे व्यासपीठ नाही. त्यामुळे मुलींनी लिपस्टीक लावणे व फॅशन करने बंद केले पाहिजे असे वक्तव्य कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी केले आहे.
वाला यांनी कॉलेज विद्यार्थिनींना फॅशनपासून दूर राहणाचा सल्ला दिला आहे. विद्यार्थिनींनी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जावे, फॅशन स्पर्धमध्ये भाग घेण्यासाठी नाही. तुम्ही कॉलेजला शिकण्यासाठी येता. कुठल्याही सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाही. म्हणून महाविद्यालयात येताना लिपस्टिक लावण्याची किंवा फॅशनेबल हेअरस्टाईल करण्याची आवश्यकता नाही, असे ते १०३ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या समारोप कार्यक्रमात गुरुवारी म्हणाले.
मुली आणि मुले हे दोघेही हुशार आहे. जीवनात काहीतरी साध्य करायचे असेल तर आपल्याला काहीतरी त्याग करणे शिकले पाहिजे. मुलांनी व्यसने व मुलींनी फॅशन सोडणे आवश्यक आहे. मुलींना आयब्रोज, नेलपॅालिश, केसांना ट्रिम करणे गरजेचे नाही. वालांच्या या वक्तव्याला महिला संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.