Karnataka High Court Hearing Viral Video: गेल्या काही वर्षांत घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची चर्चा आपण नेहमीच ऐकतो. अशा प्रकरणांमध्ये कधी पतीची चूक असते तर कधी पत्नीची. काही प्रकरणांमध्ये दोघांची चूक नसून परिस्थितीची चूक असल्याचं सांगत घटस्फोटाबाबत चर्चा केली जाते. मात्र, यामध्ये पोटगीचाही एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये पतीनं पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून काही रक्कम पत्नीला दर महिन्याला द्यावी, असे निकाल न्यायालयांनी दिले आहेत. मात्र, काही प्रकरणात या कायदेशीर हक्काचा महिलांकडून गैरवापर केला जात असल्याचंही निदर्शनास आलं आहे. असंच एक प्रकरण कर्नाटकमध्ये समोर आलं असून त्यात महिला न्यायमूर्तींनी संबंधित महिलेला चांगलंच सुनावलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटक उच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या एका सुनावणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ही सुनावणी नेमकी कधी झाली? याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नसून त्यातील तपशीलामुळे या व्हिडीओवर नेटिझन्सच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या पतीपासून घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पत्नीनं या खटल्यात अव्वाच्या सव्वा रक्कम पोटगीदाखल मागितल्यामुळे न्यायालयाने महिलेला परखड शब्दांत खडसावलं आहे. या महिलेच्या वतीने तिच्या वकिलांनी प्रतीमहिना तब्बल ६ लाख १६ हजार ३०० रुपयांची पोटगी मागितली. त्यावर समोर बसलेल्या महिला न्यायमूर्तींनी संबंधित वकिलांना समज दिली.

Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
amruta fadnavis on nanakram nebhnani gunfor women
Amruta Fadnavis on Women Safety: “दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“कृपया न्यायालयाला हे सांगू नका की एखाद्या व्यक्तीला इतके पैसे लागतात. ६ लाख १६ हजार ३०० प्रती महिना? कुणीतरी एवढे पैसे खर्च करतं का? एकटी महिला तिच्या स्वत:साठी एवढे पैसे खर्च करू शकते का? आणि तिला खर्च करायचेच असतील, तर तिला स्वत:ला कमवू द्या. पतीकडून घेतलेल्या पैशांवर नाही”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

Video: हातातलं कबुतर न उडाल्यानं पोलीस अधीक्षक संतापले, थेट शिस्तभंग कारवाईची केली मागणी!

“पैशांची मागणी करताना विचार करा”

“कृपया तुमच्या अशीलाला सांगा. हे काय आहे? त्यांच्यावर कोणतीही कौटुंबिक जबाबदारी नाही. मुलांचीही काळजी घ्यायची नाहीये. तुमच्या स्वत:साठी तुम्हाला ६ लाख १६ हजार रुपये हवे आहेत. कलम २४ चा हा अर्थ नाहीये. कलम २४ म्हणजे काही पत्नीशी वाद असल्याबद्दल पतीला दिलेली शिक्षा नाहीये. तुम्ही अशा मागण्या करताना विचार करायला हवा. तुम्ही काहीही आकडे सांगाल आणि न्यायालय कोणत्यातरी किमतीला होकार देईल असं होणार नाही”, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेला सुनावलं.

१५ हजार कपड्यांसाठी, ६० हजार जेवणासाठी आणि…

दरम्यान, याचिकाकर्त्या महिलेच्या वकिलांनी न्यायालयासमोर ही ६ लाख १६ हजार ३०० रुपयांची रक्कम कशासाही हवी आहे? याचीही माहिती सादर केली. प्रत्येक गोष्टीसाठी मागितलेली रक्कम वाचून न्यायमूर्तीही संतापल्या. यादीमध्ये सदर महिलेच्या गुडघ्यांच्या उपचारांसाठी ४ ते ५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्याशिवाय महिन्याला फक्त बूट आणि कपड्यांसाठी १५ हजार रुपये, घरात जेवण करण्यासाठी ६० हजार रुपये आणि याव्यतिरिक्त बाहेर कधी जेवायचे वेळ येते तेव्हासाठी आणखी काही हजारांची रक्कम पोटगीदाखल महिलेने मागितली होती.

Kolkata Crime : “डॉ. संदीप घोष बेवारस मृतदेह विकायचे, आणि..” आर. जी. कर रुग्णालयातील माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप

“तुमच्या अशीलाला कदाचित कळत नाहीये. तुम्ही त्यांना सल्ला द्या. हा सगळा अनावश्यक खर्च तुम्ही नमूद केलाय. प्रत्येक महिन्याला ६० हजारांचं तुम्ही काय करणार? हे आकडे पूर्ण विचारांती दिले जायला हवेत”, असंही न्यायमूर्तींनी नमूद केल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे.