कुठल्याही महिलेवर दोन जणांनी केलेला बलात्कार हा सामूहिक बलात्कार नसतो, असे विधान करून कर्नाटकचे गृहमंत्री जे.जे.जॉर्ज यांनी नवीन वादाला आमंत्रण दिले आहे. त्यांच्या या विधानावर राजकीय पक्ष व कार्यकर्ते यांनी टीका केली असून राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
चार ते पाच जणांनी एका वेळी बलात्कार केला, तरच त्याला सामूहिक बलात्कार म्हणतात, असे जॉर्ज यांनी बुधवारी एका बीपीओ कर्मचाऱ्यावरील सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रश्नावर उत्तरात सांगितले होते. मुलायमसिंह यादव यांनी एका वेळी चारपाच जण बलात्कार करूच शकत नाहीत, असे मागे म्हटले होते. अलिकडेच बंगळुरू येथे २२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता, ती बीपीओ कर्मचारी आहे.
गृहमंत्री जॉर्ज यांच्यावर टीका करताना भाजपने त्यांचे वक्तव्य असंवेदनशील असल्याचे म्हटले होते. जॉर्ज यांनी रंगसफेदी करण्याच्या प्रयत्नात दिलगिरी व्यक्त केली आहे. बलात्कार हा बलात्कार असतो व मग तो एकाने केलेला असून की टोळ्याने असे जॉर्ज यांनी सांगितले.
सामूहिक बलात्कार म्हणजे लोकांच्या आकलनाप्रमाणे टोळक्याने केलेला बलात्कार असतो पण या घटनेत तर दोनच जण सामील होते त्यांना अटक झाली आहे. तो क्रूर गुन्हाच आहे व त्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान महिला आयोगाने जॉर्ज यांना नोटीस दिली असून ताबडतोब स्पष्टीकरण मागितले आहे अन्यथा त्यांना आयोगापुढे हजर व्हावे लागेल, असे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी म्हटले आहे. स्त्रियांबाबत हिंसाचारावर ते विचार न करता बोलले आहेत. त्यांना बलात्कार म्हणजे काय हे माहिती नाही मग त्यांनी असे विधान का केले, असे आयोगाचे म्हणणे आहे.
‘दोघांनी केलेला बलात्कार सामूहिक नसतो ; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची मुक्ताफळे
कुठल्याही महिलेवर दोन जणांनी केलेला बलात्कार हा सामूहिक बलात्कार नसतो, असे विधान करून कर्नाटकचे गृहमंत्री जे.जे.जॉर्ज यांनी नवीन वादाला आमंत्रण दिले आहे
Written by रत्नाकर पवार
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-10-2015 at 01:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka home minister make controversial statement on rape