Kannada Minister struggles to write in Kannada language : भाषेच्या वृद्धीसाठी देशभारातील अनेक राज्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मात्र एखाद्या राज्याच्या मंत्र्यांनाच संबंधित राज्याची भाषा लिहिता येत नसेल तर? असाच काहीसा प्रकार कर्नाटकचे कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तांगडगी यांच्याबरोबर झाला आहे. कोप्पल जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये लिहताना अडखळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्र्‍यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री तांगडगी हे जिल्ह्यातील करातगी गावातील अंगणवाडी केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान ‘शुभवागली’ (shubhavagali) हा शब्द फळ्यावर लिहिताना गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या शब्दाचा अर्थ शुभेच्छा असा होता. दरम्यान हा प्रसंग व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

कन्नडमध्ये इतका साधा शब्द लिहिताना गोंधळ उडाल्याच्या मुद्द्यावर अशा व्यक्तीला मंत्री बनवल्यावरून सोशल मीडियावर युजर्स कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत आहेत.

कर्नाटक भाजपाने देखील तांगडगी यांच्यावर टीका केली आहे. कन्नरमैह सरकारकडून कन्नडची दडपशाही सुरू आहे असं भाजपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एकीकडे मधु बंगरप्पा जे कन्नड वाचू किंवा लिहू शकत नाहीत तर दुसरीकडे एस तांगडगी, कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री आहेत जे आहेत एक साधा शब्द लिहिण्यासाठी धडपडत आहेत.

मंत्री तांगडगी यांचं शिक्षण किती झालंय?

मूळचे बागलकोटचे असलेले तांगडगी हे कनकगिरीचे तीन वेळा आमदार राहिले आहेत आणि विज्ञान शाखेत पदवी घेतली आहे.

लक्षात घेण्याची बाब म्हणजे तांगडगी यांना शब्द लिहिण्यास अडचण आली असली तरी त्यांनी तो चुकीचा लिहिला नाही. पण ते मंत्री पदावर असल्याने ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. शिक्षणमंत्री मधु बंगरप्पा यांच्यानंतर कन्नड भाषेवरून ट्रोल झालेले तांगडगी हे दुसरे मंत्री ठरले आहेत.

नोव्हेंबर २०२४ मध्ये एका विद्यार्थ्याने मला कन्नड भाषा येत नाही असं म्हटल्यानंतर शिक्षणमंत्री मधु बंगरप्पा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.