Karnataka Youth Blows Himself With Gelatin Sticks : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिल्याने त्याने जिलेटिन कांडीचा स्फोट करत स्वत:ला उडवले आहे. या प्रकरणातील २१ वर्षीय तरुणाचा संबंध असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांडीचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. रामचंद्र नावाच्या या तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मंड्या जिल्ह्यातील कालेनाहल्ली गावात रविवारी पहाटे ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेतील मृत तरुण गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीसोबत पळून गेला होता. त्यानंतर त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. पुढे तरुणाने मुलीच्या कुटुंबीयांशी तडजोड केल्यानंतर त्याच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आला होता.

दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी मृत तरुण रामचंद्रवरील गुन्हा मागे घेतलयानंतरही, त्याने मुलीशी त्याचे संबंध काय ठेवले होती. मृत तरुण मुलीच्या कुटुंबीयांकडे, मुलीचे लग्न त्याच्याशी करावे अशी मागणी करत होता. पण मुलीच्या कुटुंबीयांनी याला नकार देत, ती वयात आल्यानंतर दुसऱ्या कोणाशीतरी तिचे लग्न करणार असल्याचे सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : निमिषा प्रियाच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला येमेनच्या अध्यक्षांची मंजूरी, भारत सरकारकडून मदतीचे आश्वासन; नेमकं प्रकरण काय?

मुलीच्या कुटुंबीयांनी त्याची लग्नाची मागणी धुडकावून लावल्यानंतर मृत तरुण नाराज झाला होता. यातूनच त्याने मुलीच्या घराबाहेर हातातच जिलेटिनची कांडी फोडली आणि यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान मृत तरुणाचे कुटुंबीय उत्खननाचे काम करायचे, त्यामुळे तरुणाला सहजपणे जिलेटिनच्या कांड्या मिळाल्या असतील, असे पोलिसांनी सांगितले. मृताच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

जिलेटिन कांडी म्हणजे काय?

जिलेटिन कांडी स्वस्तात मिळणारे स्फोटक साहित्य आहे. याचा स्फोट करण्यासाठी डिटोनेटरची आवश्यकता असते. जे सामान्यपणे खाणकाम आणि बांधकामाशी संबंधित कामासाठी वापरली जाते. फक्त परवानाधारक स्फोटक उत्पादक जिलेटिनच्या कांड्या बनवू शकतात. पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनद्वारे याच्या उत्पादनाचे नियमन केले जाते, ज्याला पूर्वी स्फोटके विभाग म्हणून ओळखले जात असे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka man blows himself up with gelatin stick after rejection aam