राज्यात अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमधील अंगणवाडी सेविकांनाही अनेक अडचणी-आव्हानांचा सामना करावा लागतोय. बेळगावमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणवाडीमधील काही मुलांनी जवळच असलेल्या एका घराच्या आवारातील बागेतून फुलं तोडल्यामुळे संतापलेल्या मालकाने अंगणवाडी सेविकेचे थेट नाक छाटले. सदर घटना सोमवारी (दि. १ जानेवारी) घडली. शहरातील एका खासगी रुग्णालयात सदर सेविकेवर उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीडित सेविकेचे नाव सुगंधा मोरे (५०) असे असून ती बेळगावमधील बसुर्टे गावातील अंगणवाडीत सहाय्यक म्हणून काम करते. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत आरोपीचे नाव कल्याण मोरे असल्याचे सांगितले जाते. पीडित मोरे कुटुंबियांनी पोलिसांवर आरोप करताना म्हटले की, या घटनेला दोन दिवस होऊनही पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.

हे वाचा >> संप दडपण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतणार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अंगणवाडीमधील मुले बाहेर खेळत असताना कल्याण मोरे यांच्या घरातील बागेतून त्यांनी काही फुलं तोडली. त्यामुळे संतापलेल्या कल्याण मोरे यांनी मुलांना मारण्यास सुरुवात केली. सुगंधा यांनी मध्यस्थी करत मुलांना मारहाण करण्यापासून रोखले. यामुळे आणखी संतापून आरोपी कल्याण यांनी घरातून कोयता आणला आणि सुगंधा मोरे यांच्यावर हल्ला करून त्यांचे नाक छाटले.

सदर गुन्हा घडल्यानंतर मंगळवारी काकती पोलिस ठाण्यात कल्याण मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी म्हटले की, आमचा तपास सुरू असून लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ.

बेळगावी जिल्ह्यात याआधीही महिलांवर अत्याचार घडल्याच्या घटना घडल्या आहेत. ११ डिसेंबर रोजी वंतामुरी गावातील एका महिलेला अर्धनग्न करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. सदर महिलेचा मुलगा एका मुलीबरोबर पळून गेल्यानंतर गावातील लोकांनी सदर किळसवाणा प्रकार केला होता.