Karnataka MLA Laxman Savadi Demand Mumbai Union Territory : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगावात सीमावाद सुरू असतानाच कर्नाटकच्या एका आमदाराने आता थेट मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील विकासाचा मुद्दा चर्चेत होता. या चर्चेदरम्यान अथणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमाला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्यानंतर सीमावाद अधिक चिघळला. तेव्हा महाराष्ट्रातील आदित्य ठाकरेंसह अनेक आमदारांनी बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले होते. आता हाच मुद्दा थेट कर्नाटकच्या विधानसभेत मांडण्यात आला आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
Rahul and Priyanka Gandhi stopped by police at Ghazipur
संभल’वरून आरोपांची चिखलफेक; राहुल गांधींचा ताफा गाझीपूर वेशीवर रोखला

हेही वाचा >> Rahul Gandhi : “राहुल गांधींमुळे मला दुखापत”, जखमी भाजपा खासदाराचा दावा; संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की

…तर मुंबई केंद्रशासित प्रदेश करा

आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, “महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असं वक्तव्य केलंय. यासंदर्भात माध्यमांनी आम्हाला प्रश्न विचारले. त्यावेळी संबंधित नेत्यांची मती भ्रष्ट झाल्याचं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी आम्ही मागणी केली पाहिजे.”

आमचाही मुंबईवर अधिकार

ते पुढे म्हणाले, आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर अधिकार आहे, असं आम्ही म्हणू शकतो. कारण पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्याठिकाणी वास्तव्य करत होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर हक्क आहे. म्हणून प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असं लक्ष्मण सवदी म्हणाले.

..तर मुंबई कर्नाटकात घ्यावे

लक्ष्मण सावदी एवढंच बोलून शांत न बसता ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल तर त्यांना तो द्यावा आणि त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेले मुंबई कर्नाटकात घ्यावे, अशीही मागणी केली.

आदित्य ठाकरेंची टीका

“मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप… कोणताही पक्ष असो… मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी”, असं आदित्य ठाकरेंनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

E

E

Story img Loader