कर्नाटकमधील उडुपीमध्ये महाविद्यालयात हिजाब घातलेल्या सहा विद्यार्थीनींना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. आता पुन्हा एकदा कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. कारण, स्पर्धा परीक्षांमध्ये मुस्लीम महिला विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास कर्नाटक सरकारने परवानगी दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. लोकांना हवे तसे कपडे घालायचं त्यांना स्वातंत्र्य आहे”, असं म्हणत उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर यांनी हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, हिंदुत्त्ववादी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >> Israel Airstrike : इस्रायलकडून रात्रभर हवाई हल्ले, ३० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू, क्रूर हल्ले थांबवण्यासाठी इराणशी चर्चा

हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगितले जाईल, अशी माहिती सुधाकर यांनी दिली. हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थींनीची कसून तपासणी केली जाईल. परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाटी ही तपासणी केली जाईल. तसंच, NEET प्रवेश परीक्षेतही हिजाब परिधान करण्याची परवानगी आहे,असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हिजाब परिधान करण्याच्या निर्णयाला हिंदुत्त्ववाद्यांकडून विरोध होत असल्याने सुधाकर म्हणाले की, “मला या लोकांचे तर्क समजत नाही. हा निवडक निषेध आहे. कोणी दुसऱ्याच्या हक्कांचे उल्लंघन करू शकत नाही. हा धर्मनिरपेक्ष देश आहे.”