Karnataka Renamed Ramanagara District: गुरुवारी राष्ट्रपती भवनातील दोन महत्त्वाच्या सभागृहांची नावं बदलण्यात आली होती. ‘अशोक हॉल’ व ‘दरबार हॉल’ ही नावं बदलून ‘गणतंत्र मंडप’ व ‘अशोक मंडप’ अशी ही नावं बदलण्यात आली. यावेळी भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब राष्ट्रपती भवनात दिसून यावं, यासाठी नावबदल केल्याचं राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं. आता आणखी एका नावबदलाला मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी कर्नाटकच्या मंत्रिमंडळानं दिली असून कर्नाटकमधील एका आख्ख्या जिल्ह्याचंच नाव बदलण्यात आलं आहे.

कर्नाटकच्या दक्षिणेकडे तामिळनाडू सीमेवर रामनगर नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला लागूनच बंगळुरू शहर व बंगळुरू ग्रामीण हे दोन जिल्हे आहेत. त्यानुसार रामनगर या जिल्ह्याचं नामकरण बदलून बंगळुरू साऊथ असं करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली होती. त्यानुसार कर्नाटक सरकारनं मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ‘रामनगर’ जिल्हा ‘बंगळुरू साऊथ’ या नावाने ओळखला जाणार आहे.

Raju Parve resigned from Umred constituency and joined Bharatiya Janata Party
माजी आमदार राजू पारवेंचे पक्षबदल, लोकसभेत शिवसेनेत, विधानसभेत भाजपमध्ये!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Sanjay Verma appointed as Director General of Police of the state
रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
Rashmi SHukla on Sharad Pawar
Rashmi Shukla Transferred : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची प्रतिक्रया, म्हणाले, “आता त्या…”
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा

“जनतेच्या मागणीनुसारच निर्णय”

दरम्यान, हे नाव बदलण्याचा निर्णय जनतेच्या मागणीनुसारच घेण्यात आला आहे, असं कर्नाटक सरकारमधील कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी पीटीआयला सांगितलं. “रामनगर जिल्ह्याचं नाव बेंगलोर साऊथ असं करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय त्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मागणीनुसारच घेण्यात आला आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “फक्त जिल्ह्याचं नाव बदलण्यात आलं असून इतर सर्व गोष्टी नेहमीप्रमाणेच होतील”, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Shivraj Singh Chouhan : शेतकऱ्यांना एमएसपी कधी मिळणार? कृषीमंत्री म्हणाले…

कर्नाटकच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या महिन्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बेंगलोर साऊथ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कर्नाटक सरकारच्या निर्णयावर भाजपाची टीका!

रामनगर जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. त्यात रामनगर, चन्नापटना, मागाडी, कनकपूर आणि हरोहळ्ळी या तालुक्यांचा समावेश आहे. रामनगर जिल्ह्याचं नाव बंगळुरू साऊथ केल्यानंतर बंगळुरू नावाला असणाऱ्या आंतरराष्ट्रीय ओळखीचा फायदा या जिल्ह्याच्या विकासाला होईल, असा दावा डी. के. शिवकुमार यांनी या प्रस्तावामध्ये केला आहे.