बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याची रवानगी २४ जूनपर्यंत बंगळुरू सेंट्रल तुरुंगात करण्यात आली आहे. कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणात रेवण्णावर बलात्काराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे इतर दोन प्रकरणात रेवण्णाने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, दोन्ही प्रकरणावरील सुनावणी अद्याप बाकी आहे.

हेही वाचा – प्रज्ज्वल रेवण्णाचे काका, जेडीएसच्या एचडी कुमारस्वामींना कॅबिनेट मंत्रीपद

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Bangladesh husband and wife, Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला अटक; एटीबीची कारवाई, आठ दिवसांपासून हॉटेलमध्ये…
Two arrested on charges of kidnapping and demanding Rs 25 lakhs
अपहरण करून २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक
Suspect related to Babbar Khalsa arrested from Mumbai NIA takes action
बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Allegations of fraud with 1700 flat buyers in Taloja housing project Developer Lalit Tekchandanis arrest is illegal
तळोजा येथील गृहप्रकल्पातील १७०० सदनिका खरेदीदारांच्या फसवणुकीचा आरोप, विकासक ललित टेकचंदानी यांची अटक बेकायदा

नेमकं प्रकरण काय?

जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर हे सगळं प्रकरण उघड आलं होतं. प्रज्वल रेवण्णावर महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचे व्हिडीओदेखील बाहेर आले होते. प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाल्याचं पुढे आलं होते. त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.

हे प्रकरण प्रकरण देशभरात पसरल्यानंतर कर्नाटक सरकारने याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. तसेच त्याच्या विरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. इतकंच नाही, तर एसआयटीने सीबीआयमार्फत इंटरपोलला रेवण्णांचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रज्ज्वल रेवण्णावर जर्मनीमध्ये असल्याचे पुढे आले होतं.

हेही वाचा – मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहणार; बंगळुरूसाठी रवाना, काय आहे आरोप?

दरम्यान, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर काही दिवसांनी आपण भारतात परतणार असून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याचा व्हिडीओ रेवण्णाने प्रसिद्ध केला होता. त्यानुसार ३१ मे रोजी तो बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला विमानतळावरूनच अटक केली होती. तसेच त्याला ६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

Story img Loader