कर्नाटकचे कायदेमंत्री जे सी मधुस्वामी यांचा फोनवरील संवाद व्हायरल झाला आहे. संबंधित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील भाजपा सरकार सध्या काहीच काम करत नाहीये, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सरकार कसंबसं सांभाळलं जात आहे, असं ते व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये म्हणाले आहेत. मधुस्वामी यांची ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सरकारमधील काही नेत्यांनी मधुस्वामी यांच्यावर टीका केली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये मंत्री जे सी मधुस्वामी हे चन्नापटना येथील एक सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्याशी फोनवरून संभाषण करताना ऐकू येत आहेत. शनिवारी ही क्लीप समोर आली आहे. शेतकऱ्यांशी संबंधित VSSN बँकेच्या विरोधात भास्कर यांनी केलेल्या तक्रारींना मधुस्वामी उत्तर देत आहेत. यावेळी मधुस्वामी म्हणाले की, “आम्ही इथलं सरकार चालवत नाही, कसंबसं ते सांभाळत आहोत. पुढील ७ -८ महिने आम्हाला हे सरकार सांभाळायचं आहे.”

हेही वाचा- राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट; मुख्यमंत्र्यांचा सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले “काही नेते…”!

संबंधित फोनवरील संवाद व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक सरकारमधील मंत्री मुनीरत्न यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मधुस्वामी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्यापूर्वी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. ते स्वत: सरकारचा एक भाग आहेत आणि प्रत्येक विषयावर मंत्रिमंडळात सहभागी होत असतात, त्यामुळे त्यांचाही यात वाटा आहे. जबाबदारीच्या पदावर असताना, त्यांनी अशी विधानं करणं योग्य नाही, ते त्यांच्या ज्येष्ठतेला शोभणारे नाही.”

Story img Loader