राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन हल्लेखोरांसह त्यांच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. रविवारी मध्यरात्री दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चंदीगडमधून या तिघांना ताब्यात घेतलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या रोहित राठोड आणि नितीन फौजी यांच्यासह उद्धम नावाच्या तिसऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिसऱ्या आरोपीची गोगामेडी यांच्या हत्येत नेमकी भूमिका काय आहे? याचा शोध पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपी रोहित आणि उद्धमला दिल्लीत आणलं आहे. तर आरोपी नितीन फौजी हा राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आहे. संबंधित आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी पाच लाखांचं रोख बक्षीस जाहीर केलं होतं. पण रविवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तिघांनाही ताब्यात घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगामेडी यांच्या हत्येनंतर आरोपींनी शस्त्रे लपवून ठेवली आणि राजस्थानमधून हरियाणातील हिसारला पलायन केलं. त्यानंतर सर्व आरोपी हिमाचल प्रदेशातील मनाली येथे गेले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर सर्व आरोपी चंदीगडला परतले, जिथे सर्वांना अटक करण्यात आली. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.