बिहार सरकारमधील मंत्री आणि आरजेडी आमदार कार्तिक कुमार यांची विधी विभागातून ऊस विभागात बदली करण्यात आली आहे. कार्तिक कुमार यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांना विधी मंत्रालयाचा कारभार देण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. अखेर आज त्यांचा विभाग बदलण्यात आला. त्यांच्या जागी आरजेडी आमदार शमीम अहमद यांना विधी विभाग देण्यात आला आहे.
हेही वाचा – सोव्हिएत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे दीर्घ आजाराने निधन
विरोधकांकडून नितीश कुमारांवर टीका
आरजेडी आमदार कार्तिक कुमार यांच्यावर २०१४ साली एका अपहरण प्रकरणी गंभीर आरोप आहेत. मात्र, असे असताना त्यांना बिहार सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आले होते. तसेच त्यांना विधी विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
हेही वाचा – आदिवासी महिलेला जीभेनं शौचालय चाटून स्वच्छ करण्यास भाग पाडलं, भाजपाच्या निलंबित महिला नेत्याला अटक
यावरून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तसेच काँग्रेस आणि सीपीआय सारख्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांकडूनही या निर्णयावर पुर्नविचार करण्याची मागणी नितीश कुमार यांना करण्यात आली होती.