भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या व्हिसा कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारपासून आयोजित पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांचा दौरा रद्द करण्यामागेही कसाबची फाशीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रोममध्ये झालेल्या एका परिषदेदरम्यान पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रेहमान मलिक यांनी भारतात येण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र, कसाबला फाशी देण्याचे केंद्र सरकारने आधीच निश्चित केले होते. अशा परिस्थितीत मलिक यांचा दौरा अडचणीचा ठरू नये, यासाठी त्यांच्या दौऱ्यास नकार देण्यात आल्याचे समजते.  परंतु पाकिस्तानकडून अधिकृत काहीही समजलेले नाही.

Story img Loader