Kash Patel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले होते. काश पटेल हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआय (FBI) या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली आहे. दरम्यान, काश पटेल यांची एफबीआयच्या संचालक पदावर नियुक्ती झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थात ‘व्हाईट हाऊस’ने काश पटेल यांचं हटके स्टाईलने अभिनंदन केलं आहे. काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘बॉलिवूड’च्या स्टाईलने त्यांच अभिनंदन करण्यात आलं आहे. व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ डॅन स्कॅव्हिनोने रणवीर सिंगच्या गाण्याद्वारे काश पटेलला बॉलिवूड शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलीवूड शैलीत केलं अभिनंदन

व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ डॅन स्कॅव्हिनो यांनी शुक्रवारी एक्स या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मल्हारी’ गाण्यात रणवीर सिंगच्या चेहऱ्याच्या जागी काश पटेलचा चेहरा एडिट करण्यात आल्याचा एक व्हिडाओ शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहलं आहे की आत्ताच काश पटेल यांचं फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नवे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तसेच अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काश पटेल यांची नियुक्ती कशी झाली?

भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआय (FBI) या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली. काश पटेल हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सिनेटमध्ये झालेल्या मतदानादरम्यान काश पटेल यांना एफबीआयचे पुढील संचालक नियुक्त करण्याच्या बाजूने ५१ मते तर विरोधात ४९ मते पडली. रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स आणि लिसा मक्रोव्स्की यांनी देखील डेमोक्रॅटीक पक्षाच्याबरोबर पटेल यांच्या नियुक्तीच्या विरोधात मत दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची निवडणुकी जिंकल्यानंतर लगेत पटेल यांच्याकडे एफबीआयची जबाबदारी सोपवली जाईल अशी घोषणा केली होती, आता यावर सिनेटने देखील शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.