जम्मू-काश्मीरच्या त्राल येथे काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सैन्याने तीन दहशवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये आशिक हुसेन भट्ट, मोहम्मद इसाक पॅरे आणि असिफ अहमद मीर अशी या दहशतवाद्यांची नावे असून हे तिघेही हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. यापैकी इसाक हा हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान मुजफ्फर वानी याचा जवळचा साथीदार होता. तल्लख बुद्धिमत्तेमुळे इसाकला त्याच्या गावात न्यूटन म्हणून ओळखले जात असे . मागील वर्षीच तो दहशतवादी संघटनेत दाखल झाला होता. याशिवाय, उधमपूर जिल्ह्यात बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये भट्ट सहभागी होता.
मिरपोरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल संध्याकाळी पोलीस आणि लष्कराने संयुक्त मोहीम हाती घेतली. मात्र, याठिकाणी आल्यानंतर दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
3 Hizb-ul-Mujahideen terrorists killed in encounter with sec forces in TraI (Visuals where terrorists were holed up) pic.twitter.com/cJjFm8CXyD
— ANI (@ANI_news) March 3, 2016