नवी दिल्ली : भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली. ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा आरोप मोदींनी केला.

काश्मीर खोऱ्यमतून १९९०मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपच्या अजेंडय़ावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले.

issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपच्या खासदारांसमोर मांडले.

कुठलाही सिनेमा चांगला की, वाईट याची नीट समीक्षा केली पाहिजे पण, त्याऐवजी या चित्रपटाविषयी शंका-कुशंका घेतल्या जात असून हे कट-कारस्थान आहे. कुठल्याही विषयावर योग्य मार्गाने सत्याची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळे चिंता फक्त या चित्रपटाबद्दल नाही. देशाच्या भल्यासाठी सत्य मांडले पाहिजे. संबधित विषयातील एक बाजू एखाद्याला महत्त्वाची वाटू शकते, दुसऱ्याला अन्य एखादी बाजू महत्त्वाची वाटेल. हा चित्रपटातून सत्य मांडले जात असेल तर त्याला विरोध कशासाठी केला जात आहे, असा सवाल मोदींनी केला.

पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आर्थिक व लष्करी मदत पुरवली गेली. दहशतवाद्यांनी अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केली. या हत्यासत्रानंतर काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पलायन करावे लागले होते. विस्थापित झालेले काश्मिरी पंडित अजूनही खोऱ्यात परत येऊ शकलेले नाहीत. हे सत्य ज्यांना दडपून टाकायचे आहे, तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.

घराणेशाही चालणार नाही!

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांवरही मोदींनी भाष्य केले. ज्यांना उमेदवारी दिली गेली नाही, त्याची संपूर्ण जबाबादारी माझीच असेल.. भाजप हा घराणेशाहीला प्रोत्साहन देणारा पक्ष नाही. घराणेशाही अन्य पक्षांमध्ये खपवून घेतली जाते, असे सांगत मोदींनी भाजपमधील कुरबुरींना लगाम लावला. संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दर आठवडय़ाला भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक घेतली जाते व मोदी स्वत: उपस्थित राहात असल्यामुळे भाजपच्या खासदारांनीही बैठकीला हजर राहण्याची अपेक्षा असते. गेल्या वर्षी संसदीय पक्षाच्या बैठकीला भाजपच्या सदस्यांची संख्या कमी होती, त्यावर मोदींनी नाराजी व्यक्त केली होती.

राज्यात चित्रपट करमुक्त करण्याची भाजपकडून मागणी

मुंबई : ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याच्या मागणीचे  विधानसभेतील ९२ आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले. त्याचबरोबर भाजपच्या आमदारांनी त्याबाबतचे फलक सभागृहात झळकवत घोषणाबाजी केली. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावरील काश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांकडूनही दाद मिळत आहे. राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीचा संदेश हा चित्रपट देत असल्याने त्यास करमुक्त करावे असे या निवेदनात नमूद केले आहे.

Story img Loader