हॉटेल व्यावसायिकांकडून ५० टक्के, तर शिकारा चालकांची ५ टक्के सवलत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वीरेंद्र तळेगावकर, श्रीनगर

समाजमाध्यमांवरील विद्वेषी प्रचाराने  पर्यटन व्यवसाय अडचणीत येऊ नये यासाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल व्यावसायिकांनी तब्बल ५० टक्के तर शिकारा, हाऊसबोट चालकांनी पाच टक्क्य़ांपर्यंत सूट दिली आहे.

काश्मीरमध्ये येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी महाराष्ट्र, गुजरातसारख्या पर्यटकांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे.  मात्र पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या तणावानंतर, समाजमाध्यमांवरून काश्मीर पर्यटनावर बहिष्काराचे आवाहन सुरू झाले. पर्यटनाचा हंगाम असलेल्या वर्षांच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांतच देशांतर्गत पर्यटकांचा ओघ त्यामुळे रोडावला. विदेशी पर्यटकांचा ओघ वाढतच असला तरी रोडावणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांमध्ये या दोन राज्यांच्या पर्यटकांमधील घट चिंताजनक असल्याचे मानत काश्मीरमधील हॉटेल व्यावसायिक आणि शिकारा, हाऊसबोट चालकांनी हे अभिनव पाऊल उचलले आहे.

काश्मीरमधील नेमकी स्थिती काय आहे, येथील वातावरण प्रत्यक्षात कसे आहे याचा सकारात्मक प्रसारही समाजमाध्यमांवर व्हावा, यासाठी प्रशासनानेही तंत्रस्नेही योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांद्वारे समाजमाध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या ‘अफवां’नी राज्यातील पर्यटक तसेच त्यांच्या सेवेतील स्थानिक व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये म्हणून त्या अफवा रोखणारे ‘व्हायरल सच’ही प्रसारित होणार आहे.

यासाठी फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांवरील वावर वाढवितानाच अनुचित घटनेची योग्य माहिती,  त्यानंतरचे दिशा-प्रवास मार्गदर्शन प्रवास प्रतिनिधी, प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या (ट्रॅव्हल एजंट/टूर ऑपरेटर) तसेच स्थानिक पातळीवर निवास व्यवस्था पुरविणाऱ्या हाऊसबोट, हॉटेलचालकांपर्यंत पर्यटकांना पोहोचविण्यात येणार आहे.

राज्याच्या पर्यटन विभागाने यासाठी विशेष यंत्रणा सुरू केली असून तिचे नियमन, नियंत्रण विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांमार्फत होईल, अशी माहिती विभागाचे संचालक निसार अहमद वणी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दहशतवादी घटनेनंतर लष्कर, केंद्रीय राखीव दल तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेकडून योग्य माहिती घेऊन ती पुरविण्याबरोबरच प्रवास, निवासासाठीचे पर्यायही तत्काळ सुचविले जाणार आहेत; याचा लाभ पर्यटकांबरोबरच स्थानिक व्यावसायिकांनाही होईल, असे समन्वयक अमरजित सिंग यांनी सांगितले. याच यंत्रणेकरिता सिंग यांची नियुक्ती खास पर्यटन विभागात करण्यात आली आहे. या यंत्रणेबरोबर टूर एजंट, गाइड, हाऊसबोट, शिकाराचालकांची संघटनाही जोडली जात आहे.

पर्यटकांमधील घसरण

                        २०१९      २०१८

जानेवारी          २५,०९५     ४ ९,२५७

फेब्रुवारी           १५,९०३     २९,११६

मार्च                 २१,२३७    ३८,६५६