पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरला भेट देत आहेत. त्यापूर्वीच पाकिस्तानने पुन्हा एकदा चिथावणीखोर भाषा वापरत जम्मू आणि काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचे वक्तव्य केले.जम्मू आणि काश्मीरचे विलीनीकरण आम्हाला मान्य नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक नाही, अशी उद्दाम भाषा पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते तसनीम अस्लम यांनी वापरली.

Story img Loader