Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. आता ३ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या दहशतवादी हल्ल्यात एक माजी सैनिक शहीद झाला, तर त्याआधीही अनेकदा दहशतवादी व भारतीय लष्करामध्ये चकमकीच्या घटनाही घडल्या आहेत. आता जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर पाच पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच पाकिस्तानी दहशतवादी एलओसीवरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत होते. दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला आणि त्यात पाच दहशतवाद्यांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी भारतीय सीमा ओलांडत होते. पण त्याचवेळी भारतीय हद्दीत टाकलेल्या भूसुरुंगावर त्यातील एका दहशतवाद्याने चुकून पाऊल ठेवल्याने भूसुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटात पाच संशयित पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. ही घटना शुक्रवारी घडली. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बटाल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाच घुसखोर घुसखोरी करत होते. या दहशतवाद्यांनी एक आयईडी देखील घेतला होता. दरम्यान, स्फोट झाल्यानंतर पाकिस्तानच्या फॉरवर्ड पोस्टवर उभ्या असलेल्या त्यांच्या साथीदारांनी मृतदेह बाहेर नेला. लष्कराने या घटनेला दुजोरा दिला आहे. ही घटना घडल्यानंतर भारतीय लष्कराकडून शोध मोहीम राबवली जात आहे.

दरम्यान, पंधरवड्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भूसुरुंगाच्या स्फोटात लष्कराचा एक जवान जखमी झाला होता. हा सैनिक कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गस्त घालणाऱ्या दलाचा भाग होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.