Kashmiri Girl Suicide बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या ( Kashmiri Girl Suicide ) काम करत होती. इराम नबी दर असं तिचं नाव होतं. इराम नबी दर ही बारामुल्ला जिल्ह्यातील मालापोरा गावाची रहिवासी होती. २३ वर्षीय इराम ही सॅम्पल एक्सिक्युशन अॅनालिस्ट म्हणून बँक ऑफ अमेरिका या बँकेत काम करत होती. तिने गुलशननगर या ठिकाणी असलेल्या घरात स्वतःचं आयुष्य संपवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इराम आणि तिच्या बॉयफ्रेंडचं भांडण झालं होतं. त्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल ( Kashmiri Girl Suicide ) उचललं. पोलिसांनी हे सांगितलं की इरामच्या ऑफिसने पोलिसांना या घटनेबाबत कळवलं होतं. तिने ७ नोव्हेंबरला लॉग इन केलं नाही. तसंच कुठल्याही कॉलला उत्तर दिलं नाही त्यामुळे शेवटी तिच्या ऑफिसने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन पाहिलं तेव्हा तिचा मृतदेह ( Kashmiri Girl Suicide ) आढळून आला.

हे पण वाचा- पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

पोलिसांना घरात काय आढळलं?

इरामचा शोध घेत असताना पोलीस तिच्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी पाहिलं की गुलशननगर या ठिकाणी असलेलं तिचं घर आतून बंद आहे. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना इरामचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार इरामच्या कुटुंबाने ही माहिती दिली की तिचं एका मुलावर फ्रेम होतं. पण ती काही काळ तणावात होती कारण तिचा बॉयफ्रेंड तिच्याशी नीट बोलत नव्हता. एका तेलगु पोर्टलच्या वृत्तानुसार इरामचा बॉयफ्रेंड तिच्याशी नीट बोलत नव्हता म्हणून तिने आत्महत्येसारखं ( Kashmiri Girl Suicide ) टोकाचं पाऊल उचललं.

इराम नबी दरचं प्रेम कुणावर होतं?

इराम नबी दरचं काश्मीरमधल्या एका तरुणावर ( Kashmiri Girl Suicide ) प्रेम होतं. ती त्याच्याशी तासन् तास बोलायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होते. या सगळ्यातून तिने टोकाचं पाऊल उचललं. बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिका या बँकेत काम करणाऱ्या काश्मिरी तरुणीने आत्महत्या केली आहे. ती हैदराबाद येथील बँकेच्या शाखेत काम करत होती.

हैदराबादमध्ये अशी आणखी एक घटना समोर

इरामप्रमाणेच एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. हा मृतदेह ( Kashmiri Girl Suicide ) हैदराबादच्या पेटबशिराबाद या ठिकाणी ही घटना समोर आली. ८ नोव्हेंबरला या महिलेचा मृतदेह मिळाला. ही महिलाही बहुदा आत्महत्येमुळेच मृत झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ही महिला तिच्या लग्नामुळे नाखुश होती त्यामुळे तिने हे पाऊल उचललं. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmiri girl suicide in hyderabad upset over bf not talking properly bank of america employee scj